कुक्कुट पालन (kukut palan) अनुदान योजने बद्दल एक अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रतील 302 तालुक्यामध्ये कुक्कुट पालनासाठी (Poultry scheme) 50 % पर्यंत अनुदान म्हणजेच 5 लाख 15 हजार रुपये पर्यंत अनुदान हे कुक्कुट पालन ( Poultry Development Yojana) गटाची स्थापना या अंतर्गत दिले जाणार आहे.
![]() |
kukut palan yojana maharashtra |
या योजनेसाठी परभणी जिल्ह्यासाठी (Parbhani District) अर्ज सुरु करण्यात आले आहेत. कुक्कुट पालन गटाची स्थापना (Poultry Development Group Establishment) योजना कशा प्रकारे राबविली जाणार आहे. कागदपत्र (Documents) काय लागतात यता बरोबर आता कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज (Application) सुरु करण्यात आले आहेत ते जाणून घेऊ या.
अर्जा साठी शेवटची तारीख :-
सातारा जिल्ह्यातील 3 तालुक्यासाठी अर्ज सुरु करण्यात आले होते. याच प्रमाणे आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत सेलू ते पालम तालुक्यासाठी देखील अर्ज सुरु आले आहेत.
या साठी शेवटची तारीख ( last date ) 30 जून 2022 आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करावेत अशा प्रकारचा आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त परभणी यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे.
योजनेसाठी अनुदान :-
कुक्कुट पालन kukut palan गट स्थापना या योजनेंतर्गत संपूर्ण प्रकल्पाची किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये आहे. यापैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना सरकारचे 50 % अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रु. असून, राहीलेले 50 % रक्कम लाभार्थी स्वतःचा उभा करेल किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उदेखील उभा करु शकेल. ज्यामध्ये 30 % प्राधान्य हे महिलांना दिला जाणार आहे.
अटी व शर्ती :-
- सर्वसाधारण, अनुसूचित जाती क्षेत्र उपयोजनेतील जे सध्यस्थितील कुक्कुटपालन लाभार्थी किंवा कुक्कुट पालन व्यवसाय kukut palan business करीत आहेत.
- यामध्ये ज्या लाभार्थींकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्रथम प्राधान्य.
- कुक्कुट पालन kukut palan व्यवसायात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योज काही यासाठी अर्ज करु शकतात.
- प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यकती साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्यात येईल.
- अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या आत असणे अनिवार्य आहे.
- 25 चौरस फुटाचे स्वतःची जागा किंवा त्याच्या मालकीची असणे अतिशय गरजेच आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अर्जदाराकडे मालमत्ता 7/12 व 8-अ उतारा
- ग्रामपंचायत नमुना नं. 4
- कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्र
- अनु. जाती/जमातीच्या लाभार्थींसाठी जातीच्या दाखल इ. कागदपत्रे अर्ज बरोबर जोडावयाची आहेत.
- या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) किंवा पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?