सोयाबीन पीक हे तेलबिया पिक म्हणून ओळखले जाते. सोयाबीन (Soybean) मध्ये ४० % प्रथिने (Protein) आणि १९ %खाद्यतेल soybean nutrition असल्यामुळे जगतिकस्तरावर अतिशय महत्वाचे पिक (Crop) म्हणून सोयाबीन पिकाला ओळखले जाते.
![]() |
Soybean Crop |
Soybean Crop :- सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते आणि ते त्याचा चांगला स्रोत आहे. सोयाबीन शाकाहारी soybean nutrition लोकांना मांसा प्रमाणेच पोषण देते, त्यामुळे त्यांचा आहारात (Diet) समावेश असतो. आजच्या या लेखात जाणून घेऊ सोयाबीन पिकाचे लागवड तंत्रज्ञान.
सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
जमीन (Land Preparation) :-
सोयाबीन Soybean Crop पिकसाठी जमीन उत्तम निचरा असणारी व मध्यम काळी (Medium – black) असावी. सेंद्रिय जमिनीमध्ये सोयाबीन हे पीक चांगले येते. सोयाबीनची लागवड (Soybean Crop) ४.५ ते ८.५ च्या पीएच (pH) असलेल्या जमिनीत करावी.
पेरणीची ची वेळ (Sowing Time) :-
सोयाबीन पिकाची (Soybean Crop) लागवड जुन ते जुलै या महिन्यात करावी.
बीज प्रक्रिया (Seed Treatment) :-
बीज प्रक्रिया Thirum (4.5 ग्रॅम प्रति किलो) किंवा Carbendazim 50 डब्ल्यू.पी.ची (तीन ग्रॅम प्रति किलो) बीज प्रक्रिया करावी. पेरणी करण्यापूर्वी Rhizobium जिवाणू खत + स्फुरद विरघळणारे जिवाणू खताची (प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 15 किलो) बीज प्रक्रिया करावी. सोयाबीनच्या (Soybean Crop) प्रमुख किडी उदा. खोडमाशी व चक्रीभुंगे यांच्या व्यवस्थापनासाठी 10 कि.ग्रॅ. फोरेट (Phorate) (10 टक्के दाणेदार) प्रति हेक्टर जमिनीत पेरणी करतं द्यावे.
पेरणी (Sowing) :-
मान्सुन (Monsoon) व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. सोयाबीनची लागवड जुन ते जुलै ( June- July) महिन्यात लागवड करावी.पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन Soybean Crop पीकासाठी अतिशय हानीकारक आहे.
त्यामुळे पेरणी करताना बियाणे 3 ते 5 सें.मी.पेक्षा जास्त प्रमाणत खोल पडणार नाही याची देखील काळजी घ्यावी. तसेच पेरणी 75 ते 100 मिलिमीटर इतक्य प्रमाणत पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.
खत व्यवस्थापन (Fertilizer Management) :-
सोयाबीन पिकसाठी Soybean Crop 30 किलो नत्र व 60 किलो स्फुरद व 20 किलो गंधक प्रति हेक्टरी प्रमाणे पेरणीच्या वेळेसच द्यावे. ज्या जमिनीत पालाशचे प्रमाण कमी होते त्या जमिनीत 30 किलो पालाश द्यावे.
ज्या जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेटचा नियमित वापर केला गेला त्या जमिनीत गंधकाच्या उपलब्धतेमुळे सोयाबीनची चांगली उत्पादकता मिळू शकते.
डायअमोनियम फॉस्फेटच्या नियमित वापरामुळे झालेली गंधकाची कमतरता त्याच बरोबर सेंद्रिय खत किंवा जिप्समचा वापर न करणे हे सोयाबीनची Soybean Crop उत्पादकता न वाढण्याचे वा घटण्याचे प्रमुख कारण आहे. नत्रयुक्त खते वा संप्रेरकांचा अनावश्यक वापर करणे टाळावा.
वाण (Varieties) :-
J. M ३३५, फुले आग्रणी, फुले कल्याणी, M. S C M ११८८, J. M. ९३-०५, K. S .L .४४१, M. A. U. S ७१, M. A. U. S. ८१.
आंतरपिके (Intercropping) :-
(Soybean: Tur) सोयाबीन + तूर (3.2 ) या प्रमाणात. कपाशी + सोयाबीन (1.1) , सोयाबीन + भुईमूग (14, 1.6) , सोयाबीन + ज्वारी (1:2, 2:2) ,सोयाबीन + बाजरी (2:4, 2:6) Soybean Crop.
पेरणीची अंतर (Sowing Distance) :-
भारी जमिन असल्यास दोन ओळीत अंत 45 से.मी. आणि दोन रोपांतील अंतर 5 सें.मी.मध्यम जमिन असल्यास दोन ओळीत अंतर 30 से.मी. आणि दोन रोपांतील अंतर 10 सें.मी.
बियाणे प्रमाण (Seed Rate) :-
जर सलग पेरणी करत असल्यास 75-80 किलो प्रती हेक्टर प्रमाणे बीज वापरावे आणि टोकन पेरणी साठी 45-50 किलो प्रती हेक्टर प्रमाणे बीज वापरावे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?