खरीप पिक भूईसपाट, विदर्भ, मराठवाड्यात साडेआठ लाख हेक्टरवरील पिके अतिवृष्टीने मातीमोल. Ativrushti Nuksan - BBC News Marathi

Wednesday, July 27, 2022

खरीप पिक भूईसपाट, विदर्भ, मराठवाड्यात साडेआठ लाख हेक्टरवरील पिके अतिवृष्टीने मातीमोल. Ativrushti Nuksan

    

Ativrushti-Nuksan
Ativrushti Nuksan

    जुलैमधील अतिवृष्टीमुळे (Ativrushti) विदर्भ आणि मराठवाड्यातील खरीप हंगाम मातीमोल झाला आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार विदर्भ आणि मराठवाड्यात ८ लाख ५७ हजार ३७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.त्याबरोबर ३ हजार ७९३ हेक्टर शेतजमीन पुरामुळे वाहून गेली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. 

     पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणत वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या सुरुवाती पासून सुरू झालेल्या मोसमी पावसाने विदर्भ आणि मराठवाड्याला आधरशा झोपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे खरिपात पेरणी केलेली पिके Crops १५ दिसापासून पाण्याखाली आहेत. नदी, ओढे, ओहळ्याकाठावरील शेतीजमिन पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे. आपण पेरणी केलेले शेत हेच का ? असा प्रश्न पडावा, अशी शेतजमिनींची अवस्था झाली आहे, मोठं आर्थिक खर्च करूनही खरडून गेलेल्या जमिनी पुढील दोन - तीन वर्ष शेती योग्य होणार नाहीत. 

विदर्भातील अवस्था 

  • अमरावती विभागात कापूर आणि सोयाबीनला फटका
  • तूर, उडीद, मूग आणि भाजीपाला पिकाचीही नासाडी
  • चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात दुबार पेरणी करणायांचे नुकसान
  • पावसामुळे अतिम पंचनामे करण्यात अडवाणी
  • नदी, नाल्याकाठच्या शेतजमिनी पुरामुळे नापीक

मराठवाड्यातील चित्र

  • अतिवृष्टीचा (Ativrushti)  नादेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका नांदेड, अर्धापूर, मुदखेड, कंधार, लोहा, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव, धर्माबाद, उमरी, किनवट, भोकर, हदगाव हिमायतनगर आणि माहूर तालुक्यातील २९, ७, ४३२ हेक्टरवरील पिके Crops  मातीमोल
  • पिके Crops  वाहून गेल्याने नांदेडमध्ये पेरणी केल्याचा कुठे मागमूसही दिसत नाही इतके प्रचंड नुकसान.
  • हिंगोलीत वसमत, कळमनुरी, हिंगोली तालुक्यात ७६ हजार ७७१ हेक्टरवरील पिंके Crops  जमीनदोस्त
  • बुलडाण्यातील चिखली मेहकर, टोगाव आणि संग्रामपूर तालुक्यात ६ हजार ९९२ हेक्टरचे नुकसान
  • नाशिक विभागातील धुळे, नाशिक नंदुरबार जिल्हयातही नुकसान

वर्धा, यवतमाळ सर्वाधिक बाधित :-

    विदर्भाचे एकूण लागवड (Cultivation) क्षेत्र ५१ लाख ८५ हजार ९०३ हेक्टर आहे. त्यापैकी ७० टक्के म्हणजे ३७ लाख ८५ हजारवर लागवड (Cultivation) झाली. प्राथमिक अंदाजानुसार, यापैकी ५ लाख ७० हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वधिका प्रमाणात नुकसान झाले आहे. 

    वर्धा , देवळी, आर्वी , सेलू, आष्टी , कारंजा , समुद्रपूर , हिंगणघाट तालुक्यातील १३ लाख १ हजार २३६ हेक्टर क्षेत्रावरील पीक वाहून गेले आहे. पाण्याखाली राहून पिवळे पडून कुजून गेले आहे. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, घाटंजी, राळेगाव, आर्णी , बाभुळगाव, उमरखेड, पांढरकवडा, वणी, झरी, मारेगाव तालुक्यांतील १२ लाख १ हजार ११३ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

    चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, सावली, भद्रावती आणि वरोरा तालुक्यांतील ५५, ९१२ हेक्टर, अमरावती जिल्ह्यातील अमरावती, धामणगाव, चांदूर बाजार, मोर्शी, तिवसा, भातकुली, चिखलदरा तालुक्यांतील २७,१७० हेक्टर, 

    अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा तालुक्यांत ७२ हजार २५२ हेक्टर, नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, हिंगणा, मौदा, पारशिवनी, कामठी, नरखेड, सावनेर, कुही, काटोल, भिवापूर, कळमेश्वर, रामटेक आणि उमरेड तालुक्यांत २८ हजार ७५२ हेक्टर, भंडारा जिल्ह्यात भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील १८ हजार ७२३ हेक्टर, गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, मुलचेरा, वडसा, अहेरी, भामरागड, सिरोंचा, आरमोरी तालुक्यांत १२ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

    गोंदिया १६८ हेक्टर आणि वाशिमध्ये २१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. नागपूर विभागाचे महसूल आयुक्त मिलिंद साळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यावरच याबाबत अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल, असे सांगितले. 

    अमरावती विभागात कापूस आणि सोयाबीनच्या लागवडी (Cultivation) खाली सर्वाधिक क्षेत्र आहे. अतिवृष्टीचा (Ativrushti) फटका या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. याशिवाय तूर, उडीद, मूग आणि भाजीपाला पिकांचीही नासाडी झाली आहे. शेतात पुराचे पाणी साचल्याने रोपे सडली आहेत. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात तर दुबार पेरणी करणाऱ्यांचे पीक हातून गेले. 

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा केला.  येत्या ३० जुलैपर्यंत नुकसानीचा अहवाल तया होणे अपेक्षित असून सततच्य पावसामुळे अंतिम पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत.


चार हजार हेक्टर जमिनीची नासाडी

    अतिवृष्टीने (Ativrushti) नदी, ओढे ओहळाच्या काठावरील शेतजमीन पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे नांदेडमधील सर्वाधिक १४२९ अमरावतीतील १२४१ यवतमाळमध्ये १४२, अकोल्यात ४४१, नागपुरातील ३२१, पुण्यातील १७५, नंदुरबारमध्ये २७ आणि ठाण्यातील १४ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. 

    खरडून गेलेल्या जमिनीत नदीचे पात्रच तयार झाले आहे शेतीयोग्य जमिनीत वाळू, दगड-गोटे साचले आहेत. ही जमीन मोठ आर्थिक खर्च करूनही पुढील दोन तीन वर्षे शेती योग्य होणार नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

या पिकांचे नुकसान 

    कापूस , भात आणि सोयाबीन य पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्या खालोखाल ज्वारी, तूर कडधान्ये, भाजीपाला आणि संत्री मोसंबी आदी फळपिकांचीही मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.