Gas Cylinder Price :- गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग, वर्षभरात २४४ रुपयांची दरवाढ, सर्वसामान्यांवर महागाईचा बुलडोझर ... - BBC News Marathi

Thursday, July 7, 2022

Gas Cylinder Price :- गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग, वर्षभरात २४४ रुपयांची दरवाढ, सर्वसामान्यांवर महागाईचा बुलडोझर ...

Gas-Cylinder-Price
Gas Cylinder Price

    स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर Gas Cylinder बुधवारी आणखी ५० रुपयांनी महागला. गेल्या वर्षभरात गॅस सिलिंडरमध्ये झालेली ही आठवी दरवाढ असून, या कालावधीत सिलिंडर २४४ रुपयांनी महाग झाला आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशात बुधवारी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या Gas Cylinder किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे दिल्लीत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत १,०५३ रुपयांवर पोहोचली. 


    वर्षभरात गॅस सिलिंडरच्या किमतीत २४४ रु. इतक्या प्रमाणत वाढ झाली. त्यापैकी १५३.३० रुपयांची वाढ मार्चपासून नोंदविण्यात आली आहे रशिया युक्रेन युद्धानंतर गॅस सिलिंडर (Gas Cylinder Price) दरात झालेली ही चौथी वाढ आहे. याआधी गॅस सिलिंडरमध्ये २२ मार्च आणि ७ मे रोजी प्रत्येकी ५० रुपये आणि १९ मे रोजी ३.५० रुपयांची दरवाढ झाली होती. 


    अनुदानित गॅस सिलिंडर Cylinder Price केवळ उज्वला योजनेच्या लाभधारकांपुरता मर्यादित ठेवण्यात आला असून, उर्वरित ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर खरेदी करावा लागतो. सिलिंडरची किंमत एक हजारपार झाल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले आहे.


सर्वसामान्यांवर महागाईचा बुलडोझर ... 

    गॅस सिलिंडर Gas Cylinder दरवाढीचा निर्णय जनताविरोधी आहे. भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकावर महागाईचा बुलडोझर चालवला आहे, अशी टीका काँग्रेसने केली महागाईविरोधात आज, आवेलन करण्यात येणार असल्याचेही कॉवोसने जाहीर केले.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.