मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून, राज्यात काही ठिकाणी पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान Havaman विभागाने दिला आहे.
![]() |
Havaman Andaj |
कोकणातील सर्व जिल्हयांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा जमा होऊ लागला असून, पेरण्यांचे प्रमाणही वाढले आहे. Havaman Andaj
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पाऊसामुळे कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. कोकणात काही भागांत २०० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातही काही भागात गेल्या २४ तासांत १८० ते २०० मिलिमीटर पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण अधिक आहे. गगनबावडा, लोणावळा, महाबळेश्वर या भागांत 24 तासांत १५० ते २०० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणी पातळी खूप वाढली आहे. घाट क्षेत्रांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र सर्वत्र पाऊस नाही. काही तुरळक भागांत गेल्या तीन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. गेल्या चोवीस तासांत परळी, मुदखेड, जाफराबाद, पातूर आणि विदर्भातील बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांत काही भागांत पावसाची नोंद झाली.
पुढील चार ते पाच दिवसांमध्ये या भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात मात्र बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागांतही चार दिवस अतिवृष्टीचा इशारा आहे. Havaman Andaj
पाऊसमान...
- मुंबई, दाणे आदी जिल्हयामध्ये गुरुवारपासून पुढील तीन दिवस पावसाच जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- रत्नागिरी, रायगड, सिधुदुर्ग आदी जिल्हयामध्ये तीन दिवस अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इसारा देण्यात आला आहे.
- पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातही प्रामुख्याने घाट विभागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
- मराठवाडा, विदर्भात काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात :-
मुंबई :- तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा लगात घेऊन राष्ट्रीय आणि राज्य आपती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या विविध विभागात तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईत कांजूरमार्ग आणि घाटकोपर येथे प्रत्येकी एक, पालघरला एक, रायगड आणि महाडला प्रत्येकी एक, दाणे दोन, रत्नागिरी-चिपळूण प्रत्येकी एक, कोल्हापूर देन, सातारा, सिंधुदुर्ग, नाटेड, गडचिरोली प्रत्येकी एक अशा आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?