![]() | |
|
Weather Today :- कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याचे संकेत आहेत. आज दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा 'अरिज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान (Weather Today) विभागाने दिली आहे..
कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. राज्यातही ढगाळ हवामान (Weather Today) असून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहेत. दिवसभर ऊन-सावल्यांचा लपंडाव सुरू असल्याने आषाढ महिन्यात आवण सरीचा अनुभव येत आहे. मॉन्सूनचा जोर कमी असल्याने मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 'ऑरेंज अलट देण्यात आला आहे.
कमी दाब क्षेत्र निर्मितीचे संकेत बांगलादेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे या भागात आज हवेचा कमी (लो अलर्ट) दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत हवामान (Weather Today) विभागाने दिले आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अनुपगडपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.
दक्षिण गुजरातपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात सर्वत्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश भागांत पावसाने जोर धरला आहे. कोकणात मुसळधार वृष्टी सुरू असून काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नद्या दुथडी भरून वाहत असून महाड आणि चिपळूण या शहरांना धोक्याचा इशारा हवामान (Weather Today) विभागाने दिला आहे.
सोमवारी संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस होता. मुंबई आणि ठाण्यातही पावसाचा जोर होता, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अधिक होते. कोकणात काही ठिकाणी रस्ते आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले असून, नद्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत. कोकण आणि दरडी कोसळल्या आहेत. रायगड आणि पालघर जिल्ह्यांनाही पावसाने अक्षरशा झोडपून काढले.
चिपळूण शहरातील अनेक रस्ते पाऊसामुळे पाण्याखाली गेले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका ते शिवाजी नगरपर्यंतचा टापूही पाण्याखाली गेला. महाबळेश्वरच्या खोऱ्यात जोरदार वृष्टी होत असल्याने महाड शहरात इशारा देण्यात आला आहे." पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह इतर भागांत पावसाने जोर धरला आहे. कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, विदर्भातील ब्रह्मपुरी, गोंदिया, नांदेड आदी जिल्ह्यांत पाऊस झाला.
गेल्या २४ तासांत कोकण विभागातील सांगे, मडगाव, माथेरान आदी भागांत शभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, राधानगरी, इगतपुरी आदी ठिकाणी मोठ्या पावसाची नोंद झाली मराठवाड्यात मात्र केवळ ढगाळ स्थिती होती. दक्षिण कोकणात पुढील पाच दिवस काही भागांत मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही काही भागांत दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान (Weather ) विभागाने दिला आहे.
जोरदार पावसाचा इशारा (अरिज अलर्ट)
कोकण :- रत्नागिरी, सिंधुदुर्ग. जोरदार पावसाचा इशारा ,कोकण ठाणे, मुंबई, पालघर, रायगड मध्य महाराष्ट्र पुणे, सातारा,.कोल्हापूर, मराठवाडा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.
विदर्भ :- अमरावती, यवतमाळ,नागपूर, गडचिरोली.
विजांसह पावसाचा इशारा
विदर्भ :- बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया.
जोरदार पावसाचा इशारा (अरिज अलर्ट)
कोकण :- रत्नागिरी, सिंधुदुर्ग. जोरदार पावसाचा इशारा , कोकण ठाणे, मुंबई, पालघर.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?