![]() |
Cotton Price |
देशातील वायद्यांमध्ये कापसाच्या दरात (cotton price) मोठया प्रमाणात वाढ झाली. ऑगस्ट आणि डिसेंबरच्या वायद्यांमध्ये खंडीमागे जवळपास ३१ हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळे 'MCX वर कापसामध्ये सट्टेबाजी सुरू असल्याचा आरोप कापड उद्योजकांकुंना करण्यात आला आहे.
पण देशात कापसाचा मोठया प्रमाणात तुटवडा असल्याने दर वाढले आहेत, असे म्हणणे जिनिंग आणि सूतगिरण्या चालकांचे आहे. मात्र देशातील वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढ पाहून देशात या वर्षी शेतकऱ्यांना कापूस पिकाला चांगला दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी दिलं आहे.
जाणकारांचे म्हणणे असे...
- देशात कापूस लागवडीचे प्रमाण वाढले.
- पावसामुळे कापूस पिकांचे नुकसान सुरू.
- नुकसान वाढल्यास उत्पादन कमी होण्याची शक्यता .
- कापसाचे दरात (cotton price) आणखी सुधारणा होण्याची शक्यता .
- आंतरराष्ट्रीय बाजारात देखिल कापूस दरात (cotton price) सुधारण्याचा अंदाज
- देशातील कापूसदरालाही आधार मिळण्याची शक्यता या मुळे नवीन हंगामात शेतकऱ्यांना ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये दर मिळण्याचा अंदाज
देशात सध्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदाच्या लागवडीच्या आकडेवारी नुसार, कापूस पिकांचे क्षेत्र सध्या वाढलेले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या हंगामात कापूस उत्पादन जवळपास 20 टक्क्यांनी कमी राहिले. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, देशात 2021 - 22 च्या खरिप हंगामात 315 लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते.
मात्र भारतात कापसाचा वापर 30 टक्क्यांनी वाढला होत. त्यामुळे देशात कापसाच्या दरात (cotton price) अतिशय तेजी आली होती. कापूस दरात ऐन आवकेच्या काळात देखिल तेजीत होते. सध्या देशातील प्रमुख बाजार समित्यांमधील सरासरी कापूस दर (cotton price) 10 हजार 621 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाचा दर कमी प्रमाणात असला तरी वायद्यांमध्ये मात्र मोठी प्रमाणात उलथापालथ सुरू आहे.
देशातील मल्टी कमोडिटीज एक्स्चेंज अर्थात 'MCX' वर गुरुवारी कापसाचे ऑगस्ट महिन्याचे वायदे प्रतिगाठी 48 हजार 900 रुपयांनी झाले आहे. एक कापूस गाठ 170 किलोची असते. तर खंडीमध्ये हा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रमाणे होतो. एक खंडी जवळपास 356 किलो कापसाची असते. ऑक्टोबर महिन्यातील वायदे 39 हजार 890 रुपये प्रतिगाठी म्हणजेच 83 हजार 534 रुपये प्रति खंडीने झाले होते.
तर नोव्हेंबरचे वायदेही 34 हजार 940 रुपये प्रतिगाठी, अर्थात73 हजार रुपये प्रति खंडीने झाले होते. मात्र डिसेंबरचे वायदे 33 हजार 880 रुपये प्रतिगाठीने पार पडले होते. खंडीमध्ये हा दर 71 हजार रुपये होतो. म्हणजेच ऑगस्ट आणि नोव्हेंबरच्या वायद्यांमध्ये 29 हजार रुपयांची तावत आहे.
तर ऑगस्ट व डिसेंबरच्या वायद्यांमध्ये 31 हजार रुपयांचा फरक पडला आहे. वायद्यांमधील हा फरक सर्वांनाच चकित करणारा आस आहे. त्यामुळे वायद्यांमधील दरविषयीची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कापसाच्या वायद्यांमध्ये झालेली इतकं फरक पहिल्यांदा पाहायला मिळत असल्याचे कापड उद्योगाचे असे म्हणणे आहे.
बाजारात कापसाचे दराचे (cotton price) प्रमाण कमी-जास्त झाले की जिनिंग रुईचा किंवा सूतगिरण्या सुताचा दर देखिल लगेच कमी जास्त होऊ शकतो. मात्र कापड उद्योगाला झालेल्या सौद्यात मात्र बदल करता येत नाही, असे इचलकरंजी येथील कापड उद्योजक विनय महाजन यांनी सांगितले आहे. देशात कापसाचे वायदे वाढत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कापसाचे दर कमी प्रमाणात आहेत.
न्यू यॉर्क येथील इंटरकॉन्टिनेंटल एक्स्चेंज अर्थात ' ICE वर ऑगस्टचे वायदे 106.91 सेंट प्रतिपाउंडने झाले आहे. खंडीमध्ये हा दर 67 हजार 241 रुपये इतकं होतो. तर डिसेंबरचे वायदे 101.800 सेंटने झाले. साधारणपणे देशातील वायद्यांचे दर न्यू यॉर्क वायद्यांपेक्षा कमी आहेत. पण १० वर्षांत पहिल्यांदाच देशातील वायद्यांचे दर अधिक आहेत.
सध्या देशातील कापसाचा भाव 60% नि जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 'ICE वरील दरानुसार व्यवहार होतात. त्यामुळे देशातून सूत, कापूस आणि कापड निर्यात देखील घटली. मात्र देशात कापसाचा पुरवठाच कमी प्रमाणत आहे. देशातील उद्योगाने कापसाचा "cotton" वापर 30 टक्क्यांपर्यंत कमी केला तरी गरज भागणार नाही, असे कापूस cotton निर्यातदार अविनाश काबरा यांनी सांगितले.
तसेच कापसाचे दर (cotton price) केवळ देशातच वाढले नाही, असेही त्यांनी नमूद केले. 'ICE' वरील कापसाचे दरही "cotton price" 90 सेंटवरून 106 सेंटपर्यंत वाढले. सध्या अमेरिकेतील पिकाला दुष्काळाचा फटका बसत आहे. त्यामुळे कापसाचा दर (cotton price) 120 सेंटपर्यंत पोचेल, असा आमचा अंदाज आहे. 'ICE' वर कापूस Cotton 120 सेंटवर पोचल्यास प्रतिखंडी 76 हजार रुपये दर होईल.
- अविनाश काबरा, कापूस निर्यातदार
जाणकारांच्या मते देशात सध्या नगण्य कापूस (Cotton) उपलब्ध आहे. त्यात मिल्स आवश्यक तेवढाच कापूस (Cotton) खरेदी करत आहेत. पुढे कापूस (Cotton) आयात वाढू शकते. तात्पुरत्या गरजेपुरताच कापूस (Cotton) खरेदी होत आहे. नवीन हंगामाआधी वायदे वाढलेत.
- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?