Fertilizer Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! खते आणि औषधांसाठी ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय ५० टक्के अनुदान, लगेच करा अर्ज. - BBC News Marathi

Wednesday, August 24, 2022

Fertilizer Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! खते आणि औषधांसाठी ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय ५० टक्के अनुदान, लगेच करा अर्ज.

Subsidy
Subsidy 

    Subsidy : शेतकऱ्यांना पिकाच्या संरक्षणसाठी औषधे, तणनाशके आणि जैविक खते अशा विविध बाबींच्या खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानासंदर्भातील (Financial) एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आलं आहे.

     

    केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे निविष्ठा अनुदान (Susidy) देण्यासाठी राबविण्यात येणारी अतिशय  महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (National Food Security Mission) होय.


अर्जाची मागणी…

    आता याच अभियाना बरोबर देशात राष्ट्रीय खाद्यतेल अभियान देखील राबविण्यात येता आहे. याच दोन्ही अभियानांतर्गत शेतकऱ्यांना (Agriculture) रब्बी आणि खरीप हंगामासाठी खते आणि औषधांच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदान (Agriculture Scheme) देण्यात येणारं आहे. त्यासाठी आता अर्ज मागविण्यास सुरुवात देखिल झली आहे.


कसा मिळणार लाभ ?

    शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म मुलद्रव्ये, जैविक खताच्या एकूण किमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपयाच्या मर्यादेत 2 हेक्टरसाठी देण्यात येणारं आहे. 

    त्या सोबत पिकाच्या संरक्षणसाठी औषधे, तणनाशके, जैविक कीड नियंत्रण इत्यादी किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये हेक्टरसाठी करण्यात आले आहे. म्हणजेच या अभियानांतर्गत शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मर्यादेत देण्यात आली आहे.  

    म्हणजेच यात शेतकऱ्यांना निविष्ठा किमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे मर्यादेत लाभ देण्यात येईल.  या योजनेचं फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.  या योजनेचं लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 2022-23 साठी जास्तीत जास्त अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून (department of agriculture) शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती
  • सातबारा उतारा 
  • आधारकार्ड व बँक खात्याची माहिती 
  • ही सर्व कागदपत्र खरीप हंगामासाठी 15 सप्टेंबर 2022 अगोदर आणि रब्बी हंगामासाठी 30 डिसेंबर 2022 अगोदर सादर करावी.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.