Goat Farming :- पावसाळ्यातील शेळ्यांचे व्यवस्थापन , आहार, पाणी नियोजन ,संभाव्य आजारावर प्राथमिक उपाय. - BBC News Marathi

Thursday, August 11, 2022

Goat Farming :- पावसाळ्यातील शेळ्यांचे व्यवस्थापन , आहार, पाणी नियोजन ,संभाव्य आजारावर प्राथमिक उपाय.

Goat-Farming
Goat Farming

    पावसाळ्यात शेळ्यांचे "Goat Farming"  गाभण राहण्याचे किंवा विण्याचे प्रमाण बाकी ऋतूपेक्षा जास्त प्रमाणत असते. वातावरणातील बदलामुळे गाभण शेळ्यांचे (Goat Farming) आजारी पडण्याची शक्यता देखील होत असते. हे लक्षात घेऊन शेळ्यांची योग्याती काळजी घेणे आवश्यका आहे.


    पावसाळ्याच्या सुरुवातीस शेळ्यांच्या (Goat Farming Management) गोठ्यातील छताची गळती असल्यास ती गळती त्वरित ठीक करावी. शेळ्यांच्या गोठ्यात पावसाचे पाणी असल्यास शेळ्यांमध्ये आजारांचे प्रमाण देखील वाढते. दुर्गंधीयुक्त वातावरणाचे प्रमाण वाढून डोळे, खूर व श्वास नलिकेचे आजार आणि इतर आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते (Goat Farming In India).


    वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जंतुसंसर्ग आजार होण्याची शक्यता असते. रात्रीच्या वातावरणातील तापमान कमी होऊन शेळ्यांना (Goat Farming) थंडी लागू शकते, या करणं मुळे गोठा रात्री बंदिस्त ठेवावा. गोठ्यातील अस्वच्छतेमुळे गाभण शेळ्यांमध्ये (Goat Farming In India) कासेचे आजार देखील होऊ शकतात. या कारणामुळे गोठा हा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवणे गरजेचे आहे.


आहार, पाणी नियोजन :-

  1. गवतावर दव असताना शेळ्यांना (Goat Farming) चरण्यासाठी सोडू नये.
  2. ओल्या चाऱ्याची साठवणूक केल्यास त्याला बुरशी लागण्याचे प्रमाण जास्त असते. असा चारा खाल्ल्याने शेळ्यांमध्ये पोटाचे आजार, गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ओल्या चाऱ्याची साठवणूक करू ठेऊ नये.
  3. ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अतिशय जास्त असते. परिणामी, त्यांना लागणारे आवश्यक असणारे घटक त्या चाऱ्यामध्ये मिळत नाहीत. म्हणून आहारात ओल्या चाऱ्यासोबातच सुक्या चाऱ्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
  4. बंदिस्त शेळी पालनामध्ये चारा हा उंचावर टांगून ठेवावा, जेणेकरून तो तुडवला जाणार नाही आणि खराब देखिल होणार नाही.
  5. गाभण शेळ्यांना २४ तास स्वच्छ पाण्याची उपलब्ध करून ठेवावी.


संभाव्य आजारावर प्राथमिक उपाय :-

  1. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाभण शेळ्यांना जंतुनाशक देणे आवशयक असते.
  2. सर्दी, बुळकांडी, हगवण इ. सारख्या आजारापासून शेळ्यांचा (Goat Farming) वेळीच उपचार करावा.
  3. गोठ्या शेजारी साठलेल्या पाण्यामुळे माश्या, डास, गोचीड यांचे प्रमाण देखील वाढते. हे सर्व घटक आजार पसरविण्यासाठी कारणीभूत आहेत. या मुळे पाण्याचा साठा गोठ्यामध्ये होऊ नये या ची काळजी घेतली पाहिजे .
  4. पावसाळ्यामध्ये जखमांवर माश्या बसून त्या चिघळणार नाहीत याची देखिल काळजी घ्यावी. माशांवर नियंत्रण आणावे. कडुनिंब, निरगुडी, करंज पाला किंवा औषधाचा वापर करून गोठ्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
  5. आजाराचे प्राथमिक लक्षण दिसताच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.


गाभण शेळ्यांची निगा :-

  1. शेळ्या (Goat Farming) विण्याच्या 1 महिना आधी आणि विल्यानंतर 1 महिना चांगला खुराक द्यावा.
  2. गाभण शेळ्यांचा आहार हा संतुलित असावा. त्यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व,पाण्याचे योग्य प्रमाण देखील असणे आवश्यक आहे.
  3. गाभण शेळ्यांना (Goat Farming) दररोज अडीचशे ते तीनशे ग्रॅम जास्त प्रमाणत खुराक द्यावा. आवश्यक हिरवा चारा आणि वाळलेला चारा देखिल द्यावा. 
  4. शेळी विण्याच्या 1 आठवडा आधी हिरव्या वैरणीचे प्रमाण कमी करून त्याऐवजी सकस वैरण देणे आवश्यक आहे.
  5. गाभण काळातील शेवटच्या आठवड्यात शेळ्यांना (Goat Farming) चरण्यासाठी बाहेर सोडू नये. गाभण शेळ्यांना कळपात न ठेवता इतर शेळ्या (Goat Farming) पेक्षा वेगळे ठेवावे. शेवटच्या आठ दिवसांत खुराकचे प्रमाण 100 ग्रॅमने कमी करावा.
  6. विण्याची तारीख नोंद करून ठेवावी. त्यावर लक्ष ठेवावे. शेळी विण्याच्या वेळी कही अडचण असल्या त्वरित पशुवैद्यकास संपर्क करावा.

- डॉ. अनुजकुमार कोळी, ९१४५०५०२३७ 

(पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.