Land : शेतकऱ्यांनो ‘या’ महत्वाच्या कागदपत्रांवरून ठरतो जमीनीचा मालकी हक्क, जाणून या बद्दलची सविस्तर - BBC News Marathi

Thursday, August 25, 2022

Land : शेतकऱ्यांनो ‘या’ महत्वाच्या कागदपत्रांवरून ठरतो जमीनीचा मालकी हक्क, जाणून या बद्दलची सविस्तर

Land
Land 

    Land : भली मोठी शेतजमीन असो वा जमिनीचा (Agriculture) तुकडा जमीन म्हटलं की, जमिनीचा मालकी हक्क (Land Owner) आलाच. मात्र अनेकदा या जमिनीच्या मालकी हक्कावरून खुप मोठमोठे वाद निर्माण होतात. 


    जसा बांधावरून शेतकऱ्यांमध्ये वाद होतो त्याचप्रमाणे जमिनीच्या (Agriculture) मालकी हक्कावरून देखील मोठ्या प्रमाणत वाद झालेले पाहायला मिळतात.  म्हणूनच जमिनीच्या मालकी (Financial) हक्काचे पुरावे देणारे काही कागदपत्रे आहेत. 


    या कागदत्रांद्वारे जमिनीचा (Land Ownership Proof) मालकी हक्क ठरवलं जातो. जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद तयार झाल्यास शेतकरी या सात पुराव्यांनी  आपल्या जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करू शकतो. चला तर मग जमिनीच्या मालकी हक्काचे अतिशय महत्वाचे पुरावे कोणते जाणून घेऊ यात.


खरेदी खत

    जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणारा अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणजे जमीन खरेदी करताना घेतलेला खरेदी खत. कोणत्याही जमीन खरेदी करतां त्या शेतकऱ्यांकडून जमिनींचे खरेदी खत बनवला जातो. 


    या कारणामुळे जमिनीचा व्यवहार ठरतो. या मुळे शेतकरी आपल्या जमिनीचा मालकी हक्क देखिल सिद्ध करू शकतात. या खरेदी खतवरून जमीन कोणत्या तारखेला आणि किती किमतीला खरेदी केली आहे याची सविस्तर महिती किंवा पुरावा दिला जातो.


सातबारा उतारा

    जमिनीची मालकी हक्क सिद्ध करणारा अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा होय. सातबारा उतारा या कागदपत्राला जमिनीचे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणून देखिल ओळखले जाते. 


    गाव नमुना क्रमांक सातमध्ये त्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्या शेतकऱ्यांच किती जमिनीवर अधिकार हे दाखवलं जातात. ही सर्व माहिती सातबारा उतारा दिलेली असते.


प्रॉपर्टी कार्ड

    बिगरशेतजमिनीवर (Land) मालमत्तेच्या हक्काविषयी पुरावा सादर करणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड (Prepaid Card) होय. या प्रॉपर्टी कार्डमुळे सदर जमीन तुमचीच आहे हे देखिल सिद्ध होते.  


    सातबारा उताऱ्यावर ज्या प्रमाणे माहिती दिली जाते त्याचा प्रमाने या प्रॉपर्टी कार्डवर (Prepaid Card) देखील महिती दिली जाते. या प्रॉपर्टी कार्डवर जमीन किंवा इमारत यांसारख्या सर्व मालमत्तेची नोंद केली जाते.  या साठी तुम्ही ऑनलाईन नोंदणी देखिल करू शकता.


जमीन महसूलाच्या पावत्या

    तुम्हाला माहीतच असेल की, प्रत्येक वर्षी जमिनीचा महसूल कर भरावा लागतो. हाच प्रत्येक वर्षी महसूल भरल्यानंतर तलाठी या महसुलाची पावती देतात. याच पावत्या जमिनीची मालकी आपलीच आहे हे देखिल सिद्ध करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पावत्या अतिशय जपून ठेवाव्यात.


जमिनीबाबतचे जुने खटले

    अनेकदा जमिनीवरून शेतकऱ्यांमध्ये  कोर्टात केस किंवा खटला चालू असतो. तुम्ही या खटल्याचे सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवू शकता किंवा त्याची झेरॉक्स अथवा या खटल्याचा लागलेला निकाल हे सर्व कागदपत्रे जपून ठेवू शकता. 


    हीच जमिनीचा वाद उद्भवल्यास किंवा जमिनीचा पुरावा सादर करण्याची वेळ आल्यास तुम्ही पुरावा म्हणून जमिनीबाबतचे जुने खटले वापरू शकता.


जमीन मोजणीचे नकाशे

    जमिनीची मोजणी (jamin mojani map) करण्यासाठी जमिनीचे नकाशे काढले जातात. हेच नकाशे तुम्ही जपून ठेवल्यास जमीनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी वापरत येऊं शकतात. 


    जमिनीची कोणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, यासंदर्भात सविस्तर माहिती जमीन मोजणीचे नकाशे (jamin mojani map) यावर दिलेली असते.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.