पीक विमा योजनेत ९२ लाख शेतकऱ्यांचा सहभाग, राज्यात या वर्षी आठ लाख शेतकरी वाढले तर ५४ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित. Pik Vima Yojana - BBC News Marathi

Monday, August 8, 2022

पीक विमा योजनेत ९२ लाख शेतकऱ्यांचा सहभाग, राज्यात या वर्षी आठ लाख शेतकरी वाढले तर ५४ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित. Pik Vima Yojana

Pik-Vima-Yojana
Pik Vima Yojana

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) खरीपसाठी यंदा राज्यातील जवळपास ९२ लाख ४ हजार ४६३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १४ जिल्ह्यांतून सुमारे आठ लाख नवीन शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. पीक विमा योजनेतून (Pik Vima Yojana) खरिपातील जवळपास ५४ लाख ३४ हजार ५५२ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे.


    अतिवृषटी, दुष्काळ, वादळ आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pik Vima Yojana) राबविण्यात येत आहे. 


    या वर्षी बीड पटर्ननुसार राबविण्यात आलेली ही योजना एचडीएफसी इर्गो इंडिया कंपनी लिमिटेड (HDFC Ergo India Company Limited), भारतीय कृषी विमा कंपनी (Agricultural Insurance Company of India), आसीआयसीआय लोंबार्ड (ACICI Lombard) , जनरल इंडिया कंपनी लिमिटेड (General India Company Limited), बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स (Bajaj Allianz General Insurance) या कंपन्यांद्वारे महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. 


या जिल्ह्यांत सहभाग घटला :-

    खरिपासाठीच्या या वर्षी पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) गतवर्षीच्या तुलनेत सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत शेतकऱ्यांचा सहभाग होण्याचे प्रमाण वाढला. 


    तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, वर्धा, लातूर, नागपूर, , भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा सहभाग होण्याचे प्रमाण घटला आहे. 


    यंदा शेतकऱ्यांनी विमा Insurance हप्त्यापोटी ६०९ कोटी रुपये भरले. राज्य सरकारच्या हिस्सा १८०२ कोटी २४ लाख, तर केंद्र शासनाच्या हिस्सा १७९९ कोटी ९९ लाख रुपये आहे. या वर्षी कोकण विभागात ८३,०३८, नाशिक विभागात ३,६५,९७५, पुणे विभागात ४,०८,८४५, कोल्हापूर विभागात ३२,३१९, औरंगाबाद विभागात ३१,१९,७८६, लातूर विभागात ३५ लाख ११ हजार १२७, अमरावती विभागात १४ लाख २३ हजार १७५ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. 


    बीड, जालना, औरंगाबाद, हिंगोली, नांदेड या  जिल्ह्यांत या वर्षी सर्व अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यात ३ लाख ७५ हजार १०१ शेतकरी हे बिगर कर्जदार, तर ८८ लाख २९ हजार ३६२ हे कर्जदार शेतकरी आहेत.


५४ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित

    यंदा महाराष्ट्रातील ९२ लाख ४ हजार ४६३ शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा (Pik Vima Yojana) भरला आहे. गेल्या वर्षी ८४ लाख ७ हजार ३२८ शेतकरी वीमा हप्ता भरला होते. त्या तुलनेत या वर्षी ७ लाख ९७ हजार १३५ इतक्या शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. या वर्षी ५४ लाख ३४ हजार ५५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा भरण्यात आला आहे.


नगरमध्ये 'कृषी' ची उदासीनता 

    नगर जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे प्रधानमंत्री विमा Insurance  योजनेचा प्रचार व प्रसार झाला नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी शेतकऱ्यांचा विमा Insurance योजनेत सहभाग मोठया प्रमाणत घटला आहे. विमा Insurance  योजनेतील तक्रारींकडेही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणावर वाढल्या आहेत. तरीही वरिष्ठ पातळीवर तक्रारीची दखल घेतली जात नसल्याची सध्या स्थिती आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.