Soybean : मराठवाड्यात सोयाबीनवर ‘पिवळा मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव, पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे, असे करा सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन. - BBC News Marathi

Tuesday, August 9, 2022

Soybean : मराठवाड्यात सोयाबीनवर ‘पिवळा मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव, पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे, असे करा सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन.

Soybean
Soybean 

    सध्यस्थितीमध्ये मराठवाड्यातील सोयाबीनवर (Soybeans) 'पिवळा मोझॅक' (केवडा) रोगाचा प्रादुर्भाव वाढलं आहे. या रोगाचा प्रमाण कमी अधिक असले तरी पोषक स्थितीमुळे विषाणूंमुळे पसरणाऱ्या या रोगाची वेळीच ओळख पटवून त्यावर एकात्मिक पद्धतीने नियंत्रणाची गरज आहे.


    या वर्षाच्या खरिपात मराठवाड्यातील सोयाबीन (Soybeans) पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्रावर फक्त सोयाबीनची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या हंगामाच्या तुलनेत या वर्षी जवळपास तीन ते चार % सोयाबीन (Soybeans) पेरणी क्षेत्र वाढले आहे. २३ लाख ५५ हजार ३९ हेक्टरवर पसरलेल्या या सोयाबीनच्या क्षेत्रापैकी विशेषतः: बीड , उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि  जालन्यातील काही ठिकाणी 'पिवळा मोझॅक' रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.


    अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव, लोखंडी सावरगाव, श्रीपत रायवाडी येथे या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम निदर्शनास आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (Agricultural University) कृषी तंत्रज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, कडधान्य आणि तणे ही याच्या पर्यायी यजमान वनस्पती आहेत. या रोगामुळे सोयाबीनच्या उत्पादनात  १५ ते ७५ टक्केपर्यंत घट येऊ शकते.


    'पिवळा मोझॅक' रोग आता काही प्रमाणात महाराष्ट्रातही डोके वर काढतो आहे. या रोगावर सजग राहून वेळीच नियंत्रण करावे," असा सल्ला ' वनामकृवि'च्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. जी. डी. गडदे यांनी दिला. डॉ. डी. डी. पटाईत आणि एम. बी. मांडगे या बरोबर तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे पीक रोग शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनीही मार्गदर्शन केले. 


    बीड जिल्ह्यासह इतर भागात प्रदुर्भावग्रस्त पिकाच्या मिळालेल्या माहितीवरून प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन त्याची तीव्रता व शिफारशीत उपाययोजना शेतकऱ्यांना सांगण्याच्या सूचना कृषी विभागाने यंत्रणेला दिल्या आहेत. आजपासून ही मोहीम अधिक गतिमान करण्यात येणार आहे. 

- डॉ. डी. एल. जाधव, 

विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद.


पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे

    सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीजवळ पिवळ्या रंगाचे चट्टे किंवा अनियमित पट्टे तयार होणे. त्यानंतर सोयाबीनचे पाने जसे परिपक्व होत जातात, तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे तयार होणे. काही वेळा जास्त प्रमाणत प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. 


    लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फूले आणि शेंगा अतिशय कमी लागतात. पर्यायाने उत्पन्नात मोठी प्रमाणत घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण  देखील घटते. तर, प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. या विषाणूचा (Soybean) पानातील रसामार्फत प्रसार होतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशीद्वारे केला जातो.


असे करा व्यवस्थापन

  1. पिवळा मोझॅक झालेली प्रादुर्भावग्रस्त झालेले पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. त्यामुळे निरोगी झाडांवर या रोगाचं प्रसार कमी करणे शक्य होईल. . 
  2. वेळोवेळी सोयाबीन (Soybeans) पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे..
  3. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच थायामेथोक्झाम २५ % हे कीटकनाशक (४० ग्रॅम प्रति एकरी) फवारणी करावी. 
  4. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रतिएकरी १० प्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. 
  5.  फवारणी करण्यासाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.
  6. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर करणे टाळावा. 
  7. मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा प्रकारे पिकांवरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे. 
  8. कमीत कमी पहिले ४५ दिवस सोयाबीन (Soybeans) पीक तणमुक्त ठेवावे.
  9. पावसाचा ताण पडल्यास सोयाबीन (Soybeans) पिकाला संरक्षित पाणी द्यावे. 
  10. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड करणे शक्यतो टाळावे, जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडेल.
  11. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता असल्यास १० दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.