 |
Today Weather |
दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्याला देखिल मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अतिवृष्टी च्या पाऊस (Today Weather) मुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यात देखिल मुसळधार पाऊस (Today Weather) कोसळला. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस (Today Weather) सुरू असून, नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क देखिल तुटली आहे. रत्नागिरीतील राजापूर लांजा येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, मालवण येथे 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला.
या मध्ये राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह जिल्ह्याच्या काही ठिकाणी जोरदार पाऊस (Today Weather) झाला आहे. गगनबावडा येथे 160 मिलिमीटर तर आजरा येथे 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. तर पुणे, नाशिक, धुळे, नगर, नंदूरबार जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार सुरु आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त असल्याचे दिसून आले आहे.
किनवट येथे 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर परभणी, हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. निम्न दुधना, विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा (Today Weather) विसर्ग करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील दुधड, शेकटा परिसरात झालेल्या पावसाने लाहूकी नदी दुथडी भरून वाहत आहे. विदर्भात देखिल पावसाने हजेरी लावली असून, बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणत पिकांचे नुकसान झाले आहे.
२४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये
कोकण : राजापूर, लांजा प्रत्येकी 170, देवगड 80, वैभववाडी 150, दोडामार्ग 130, कणकवली, वेंगुर्ला प्रत्येकी 120, मालवण 100, मुरबाड, कुडाळ 140, रामेश्वर प्रत्येकी 70, रत्नागिरी 60.
मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 160, ओझरखेडा, चंदगड 80, गडहिंग्लज 50, चाळीसगाव, धुळे, शाहूवाडी, राधानगरी, कोल्हापूर, भोर प्रत्येकी 40, इगतपुरी, गिरणा धरण, जुन्नर, गिधाडे, भडगाव, आजरा 110, नवापूर, कागल, रावेर प्रत्येकी 30.
मराठवाडा : किनवट 120, माहूर 70, देगलूर, सेलू 40, रेणापूर, बिलोली 60, नायगाव खैरगाव, वाशी, निलंगा, केज प्रत्येकी 30 मिलिमीटर.
विदर्भ : सिरोंचा 70, जेवती, राळेगाव प्रत्येकी 40, संग्रामपूर, वरोरा, जळगाव जामोद, पांढरकवडा 50, घाटंजी प्रत्येकी 30.
मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
रायगड, पुणे,रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, .
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : मुंबई, ठाणे.
विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली , भंडारा.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
- कोकण : ठाणे, पालघर, रायगड, मुंबई,.
- मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर , नाशिक.
- मराठवाडा : हिंगोली, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, लातूर,नांदेड.
- विदर्भ : वाशीम, बुलडाणा, यवतमाळ ,अमरावती, अकोला. .
महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलं आहे. तर पूर्व विदर्भात पावसाचा (Today Weather) येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा (monsoon) आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, हा पट्टा गुजरातच्या नालिया, अहमदाबाद, ब्रह्मपुरी, जगदलपूर, तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय झाले आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, अरबी समुद्रातील चक्राकार वारे या पोषक प्रणालींमुळे महाराष्ट्रात पावसाचा (Today Weather) जोर वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा (Yellow Alert) देण्यात आला आहे. उर्वरित भागात विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?