One Nation One Election : देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) हे नवं विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर केली जाणार असल्याची माहिती आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पण आपल्या देशात एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया काही नवीन नाही. या आधी निवडणुकीचा इतिहास पाहिला तर पहिल्या चार निवडणुका, 1951-52 ते 1967 पर्यंतच्या या याच पद्धतीने एकाच वेळी घेण्यात आल्या होत्या.
What Is One Nation One Election
भारत हा खंडप्राय देश असून आपल्या देशात सतत कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका सुरू असतात. त्यामुळे निवडणूक आयोग आणि त्या ठिकाणच्या प्रशासनावर कायमच दबाव असतो. सततच्या निवडणुकांमुळे अनेकदा काही महत्त्वाची धोरणं अवलंबनं अडचणीचे ठरते. तसेच निवडणुकीसाठी मोठा खर्चही होतो. मग अशावेळी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणजेच एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया राबवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
सातत्याने निवडणुकीमुळे प्रशासनावर येणारा ताणही कमी होऊ शकतो आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे काही प्रमाणात का असेना दूर होतील असा एक मतप्रवाह आहे.
एक देश एक निवडणूक म्हणजे सर्व देशात एकाच वेळी निवडणुका घेणे. म्हणजे एकाच वेळी लोकसभेसोबत सर्वच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेणे. म्हणजे निवडणुकीमुळे होणाऱ्या खर्चात मोठी बचत होते.