Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

जमीन मोजणी कशी करावी । जमीन मोजणीचे प्रकार चला माहिती करून घेऊया | land record maharashtra

land record maharashtra

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे बांदाचे वाद, जागेचे वाद ही आहे जेव्हा आपल्या 7/12 वरील नोंदी पेक्षा आपली जमीन कमी भरते तेव्हा आपण सर्वप्रथम विचार करतो ते म्हणजे जमीन मोजणीचा आज आपण या लेखात बघणार आहोत जमीन मोजणीचे प्रकार  (land record maharashtra) कोणते आहेत आणी ते कसे वापरावे तर चला समजून घेऊया कारण माहिती असायलाच हवी.

जमीन मोजणीचे प्रकार

  • शेतजमीन हद्द कायम.
  • पोटहिस्सा.
  • बिन शेती.
  • नगर भूमापन हद्द कायम.
  • भूसंपादन.
  • कोर्ट वाटप.
  • कोर्ट कमिशन.
  • निमताना मोजणी
1. शेत जमिनीची हद्द कायम मोजणीची सर्वसाधारण कार्यपद्धती
    जमीन धारकांस उपलब्ध असलेल्या अभिलेखा प्रमाणे त्यांचे गटाची किंवा पोटहिस्य्याची हद्द कायम करुन मागता येते. जमीन मोजणी करिता नमुन्यातील तपशील संपूर्ण भरून उपअधीक्षक भूमि अभिलेख यांचे कडे अर्ज करावा लागतो.
    मोजणी करुन घेणे करिता साधी / तातडी / अतितातडी फी भरणेचा पर्याय उपलब्ध आहे. मोजणी अर्ज प्राप्त झाल्यावर प्रकारानुसार संगणकाद्वारे मोजणी रजिष्टर नंबर देउन प्राथम्य क्रमानुसार अर्जाबाबत मोजणी कार्यवाही करण्यात येते.
    परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यावर मोजणी प्रकरण निकाली काढणेचा विहीत कालावधी साधीमोजणी ६ महिने, तातडी ३ महिने व अतितातडी २ महिने असा आहे. मोजणीपूर्वी लगत कब्जेदारांना विहित मुदतीत नोटीस काढणेत येते.
    मोजणी फलकयंत्राचे सहाय्याने करणेत येउन अभिलेखा प्रमाणे हद्द जागेवर दाखवणेत येते. मोजणीचे वेळी अर्जदारास मोजणी कामी लागणारे निशाणदार मजूर, चुना, बांबु वर्गरे बाबी पुरवाव्या लागतात. दाखवलेल्या हद्दीवर दगड रोवून घेणेची जबाबदारी अर्जदार यांची असते.
    भूकरमापकाने केलेली मोजणी मान्य नसलेस प्रथम निमताना (उच्च तपासणी) व ती सुद्धा मान्य नसलेस सुपरनिमताना मोजणी विहित फी भरुन मागता येते. हद्द कायम मोजणी अंती मोजणी नकाशा ची क प्रत अर्जदारास विनामुल्य पुरविणेत येते.
    बऱ्याच (सहहिस्सेदारांना) शेतक-्यांना त्यांचे वहिवाटीनुसार किंवा 7/12 क्षेत्रा नुसार मोजणी हवी असते तथापि त्यांचे संयुक्त धारण क्षेत्राची पोटहिस्सा मोजणी मध्ये येते. त्यामुळे त्याबाबत पोटहिस्सा मोजणी अर्ज सादर करावा.

← Previous
Best Financial Habits to Build Long-Term Wealth in India
Next →
Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 25 हजार बागायतदारा शेतकऱ्यानं मिळणार 27 कोटींचा विमा मंजूर, कसा तो वाचा सविस्तर

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.