Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

पोट हिस्सा जमीन मोजणी माहिती | Pot Hissa Mojani

Pot Hissa Mojani

2. शेत जमीनीची पोट हिस्सा मोजणी

सर्व सहहिस्सेदारांची संमती असलेस त्यांचे वहिवाटीनुसार किंवा क्षेत्रानुसार पोटहिस्सा मोजणी बाबतची कार्यवाही करुन पोटहिस्सा नकाशाचा व आकार(सारा) याचे विभाजन मोजणीअंती करणेत येते. तथापि एकत्रीकरण कायद्यानुसार तुकडा पडत असलेस अशी मोजणी करता येत नाही. मोजणी फीचे चलन भरुन विहीत नमुन्यातील अर्ज उपअरधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडे करावा लागतो.

या मोजणी करीता साधी / तातडी/ अतितातडी हे पर्याय उपलब्ध आहेत. पोटहिस्सा मोजणी करताना मुळ सव्र्हे क्रमांकाची हद्द विचारात घेउन अर्जदारांचे वहिवाटी नुसार किंवा क्षेत्रानुसार तुकडेबंदी नियमास अधीन राहून नविन पोटहिश्याचा नकाशा तयार करणेत येतो व पोटहिस्सा नमुना ४ भरुन क्षेत्राची समज संबंधितांना देणेत येते.

पोटहिस्सा फॉर्म नं. ११ द्वारे आकार विभागून पोटहिस्सा नमुना नं. १२ (फाळणी बारा) हा ७/१२ ची वेगळी पाने उघडणे कामी संबंधित तलाठी यांचे कडे नकाशासह पाठविणेत येतो. महसूल विभागाकडून त्याप्रमाणे ७/१२ वेगळे करणेत येतात. मोजणी फी तक्त्याप्रमाणे आकारली जाते. पोटहिस्सा मोजणीचे प्रलंबीत काम खाजगी संस्थामार्फत करुन घेणेचे शासनाचे प्रयत्न चालू आहेत.

3. बिनशेती मोजणी

समक्ष प्राधिका-्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा कमल ४४ अन्वये कायम बिनशेतीचे आदेश पारित केल्यास बिनशेती मोजणी करणेत येते. बिनशेती मोजणी करणेसाठी सक्षम प्राधिकारी यांचे कडील मंजूर रेखांकनाचा नकाशा आवश्यक असतो.

सक्षम प्राधिका-्याचे या आदेशासह विहीत नमुन्यात मोजणी अर्ज, मोजणी फी सह उपअधीक्षक भूमि अभिलेख यांचे कडे सादर करावा लागतो. ही मोजणी १ : ५०० या परिमाणात केली जाते. बिनशेती बाबतची नोंद गाव नमुना नं. २ मध्ये घेणेत येते.  नगर भूमापन क्षेत्रातील बिनशेती मोजणीअंती व अधिकार अभिलेख तपासून मिळकत पत्रिकेवर नोंदी घेणेत येतात.

4. नगर भूमापन हद्द कायम

ज्या महानगर पालिका / नगर पालिका / २००० हजार लोकसंख्येवरील गावठाणांचे सर्वेक्षण पूर्ण होऊन त्याचे परिनिरीक्षण चालू आहे तेथे नगर भूमापन अभिलेखाप्रमाणे मोजणी करुन हद्द कायम करुन घेता येते. सदर क्षेत्रात मिळकत पत्रिका हाच अधिकार अभिलेख आहे. याकरीता विहीत नमुन्यातील अर्ज योग्य त्या कागदपत्रासह संपूर्ण भरुन विहीत मोजणी फी भरून उपअरधीक्षक भूमि अभिलेख यांचे कडे करावा लागतो.

या मोजणी करीता साधी/ तातडी / अतितातडी/ अतिअतितातडी असे पर्याय उपलब्ध आहेत. अति अतितातडी मोजणी ची मुदत १० दिवस आहे. ज्या नगर भूमापनाकडील मिळकती बिनशेतीकडे वर्ग झालेल्या नाहीत व त्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडून बिनशेती आदेश प्राप्त नाहीत तेथे ते प्राप्त करुन प्रथम बिनशेती मोजणी करुन नंतरच मिळकत पत्रिकेवर नावे दाखल करुन घ्यावी लागतात.

नगर भूमापन हद्दीत समाविष्ट सर्वे नंबर पैकी शेतीकडे राहिलेल्या भागाचा ७/१२ हा अधिकार अभिलेख आहे. विहीत मुदतीतच्या आगाऊ नोटीसद्वारे अर्जदार व लगत कब्जेदार यांना कळवून अभिलेखाचे आधारे मोजणी करणेत येउन हद्दी दाखविण्यात येतात.

मोजणीअंती योग्य त्या टिपांसह क प्रत अर्जदारास मोफत पुरविणेत येते. viii) समान सत्ताप्रकार व धारकांच्या मिळकती असतील तर त्यांचे एकत्रीकरण म. न. पा. / न. पा. यांचे कडील मंजूरी आदेश व नकाशा यासह अर्ज केल्यास करता येते. ix) मिळकतीचे पोटविभाजन करण्यासाठी म. न. पा. / न. पा. यांचेकडील मंजूरी ओदश व नकाशा व सहहिस्सेदारांचे संमतीपत्र विहित पोटहिस्सा मोजणीसाठी अर्ज आवश्यक असतात.

← Previous
कडबा कुट्टी मशीनसाठी अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु | chaff cutter
Next →
PM Kisan : शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 12 वा हप्ता, कसा ते जाणून घ्या सविस्तर

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.