Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

Subsidy : शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान लटकले

Subsidy

राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी (Farmer) कर्जमुक्ती योजनेतंर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज (Loan) माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता.

 

दिवाळीपुर्वी पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, एकाच शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन बँकेत नावाचा समावेश असलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे अनुदान लटकले आहे. त्यामुळे अनुदान कधी मिळणार असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे. राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत प्रोत्साहन अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होईल

शेतकरी दिवाळी आनंदाने साजरी करतील अशी घोषणा करण्यात आली होती. तालुक्यातील ८५ गावातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले सरकार केंद्रावर आधार प्रमाणिकरण केले असून घोळ नसलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पण दोन बँकेत एकाच नावाने असलेल्या यादीतील समावेशमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

    हे वाचा : सोयाबीन बाजारात आज काय घडलं ?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यादीमधील नावापुढे आधार प्रमाणिकरण न करता महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या यादीमधील नावाचा शोध घेऊन आधार प्रमाणिकरण करण्यात आले. या घोळात शेकडो शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अद्यापही मिळाले नाही. प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून,

नियमित कर्जाची (Loan)  परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहन अनुदान केव्हा मिळणार, असा सवाल करीत आहेत. एवढेच नव्हे, तर प्रोत्साहनपर अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा झाले का याची विचारपूस करण्यासाठी बरेच शेतकरी बँकांच्या पायऱ्या झिजवीत आहेत. मात्र, त्यांना गेल्या पावलीच निराश होऊन परत जावे लागत आहे.

Next →
कोर्ट वाटप / विभाजन प्रकरणातील मोजणी माहिती करून घेऊया | court commission mojani

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.