Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

Soybean Cotton Rate : सोयाबीन, कापूस, मक्याच्या भावात वाढ.

Soybean Cotton Rate

दिवाळीमुळे मागील सप्ताहात आवक कमी झाली होती. ४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात मात्र खरीप पिकांची आवक (Kharif Crop Arrival) वाढलेली आहे. विशेषतः कापूस (Cotton), मका (Maize), सोयाबीन (Soybean) व कांदा यांची आवक (Onion Arrival) गेल्या सप्ताहाच्या तुलनेने अनुक्रमे ३.३, ३.२, ४.७ व २.१ पटीने वाढलेली आहे.

परंतु मागणी टिकून असल्याने वाढत्या आवकेचा परिणाम कांद्याखेरीज इतर पिकांवर जाणवला नाही. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ४ टक्क्यांनी, मक्याचे १.६ टक्क्याने व सोयाबीनचे (Soybean Rate) ३.४ टक्क्यांनी वाढले. कांद्याचे मात्र घसरले. ३१ ऑक्टोबर रोजी शासनाने रब्बी पिकांसाठी हमीभाव जाहीर केले.

हरभऱ्याचे हमीभाव प्रति क्विंटल रु. ५,३३५ असतील. गेल्या वर्षी ते रु. ५,२३० होते. सध्या NCDEX मध्ये मक्याचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च डिलिव्हरीचे व्यवहार उपब्ध आहेत. हळदीचे नोव्हेंबर, डिसेंबर, एप्रिल व मे डिलिव्हरीचे व्यवहार, तर MCX कापसाचे नोव्हेंबर व डिसेंबरसाठीच व्यवहार करता येतील.

    या सप्ताहातीमधील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) ऑक्टोबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.२ टक्क्याने घसरून रु. ३१,३६० वर आले होते; या सप्ताहात मात्र ते ४ टक्क्यांनी वाढून रु. ३२,६३० वर आले आहेत.

डिसेंबर डिलिव्हरी भाव रु. ३१,८३० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ४ टक्क्यांनी वाढून रु १,८०१ वर आले आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत गेल्या सप्ताहात ४.८ टक्क्यांनी वाढून रु. ५,५५६ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ५,७४४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

मका

मक्याच्या स्पॉट किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती १.६ टक्क्याने वाढून रु. २,१७१ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (डिसेंबर डिलिवरी) किमती रु. २,२४९ वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स किमती रु. २,२४९ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती गेल्या सप्ताहात ०.२ टक्क्याने वाढून रु. ४,६५८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्याने घसरून रु. ४,६४३ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

कांदा

कांद्याच्या किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याची स्पॉट किमत गेल्या सप्ताहात रु. २,५६० होती; या सप्ताहात ती रु. २,२२५ वर आली आहे.

← Previous
IPL 2023 Retained and Released players List.
Next →
SBI ची जमिन खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या योजने बदल संपूर्ण माहिती. Land Purchase Loan SBI

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.