Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

SBI ची जमिन खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या योजने बदल संपूर्ण माहिती. Land Purchase Loan SBI

Land Purchase Loan SBI

SBI ची जमीन खरेदी योजना नक्की काय आहे ?

  • SBI चा मेन उद्देश हाच आहे की सर्व शेती करणारे भूमिहीन शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन शेतजमीन विकत घेऊन शेती करतील.
  • यासोबतच कमी जमीन असलेले शेतकरी व जास्त जमीन असलेले शेतकरी यांनासुद्धा एसबीआय च्या माध्यमातून शेत जमीन खरेदी करता येईल.
  • सर्व शेतकरी बंधू भगिनींना व इच्छुक लोकांना या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करता येईल.
फक्त हेच लोक या योजनेसाठी करू शकतील अर्ज
  • योजनेअंतर्गत दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे असंचित अशी पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे, यासोबतच सिंचन जमीन अडीच एकर पेक्षा कमी आहे अशा शेतकरी बंधू भगिनींना जमीन खरेदीसाठी या योजनेचा लाभ घेता येणार.
  • याशिवाय जे कोणी भूमिहीन शेतकरी आहेत आणि ते शेतकरी दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करतात रोजगार करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा पूर्णपणे लाभ घेता येणार आहे.
  • जी कोणी अर्ज करणारे शेतकरी आहेत त्यांची दोन वर्षाचे कर्जफेडची नोंदणी असणे आवश्यक आहे. कमीत कमी दोन वर्षाचे दुसऱ्या बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर एसबीआय बँक विचार करू शकते पण त्यांच्यावर इतर कोणत्याही बँकेचे कर्ज असता कामा नये.
किती कर्ज मिळणार ?
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये अर्ज केल्यानंतर बँक आपण जमीन खरेदी करणार आहोत त्या जमिनीच्या किमतीचे आकलन करून त्या जमिनीच्या खरेदीसाठी जेवढी किंमत भरत आहे त्या किमती पैकी 85 टक्के कर्ज हे एसबीआय कडून तुम्हाला दिले जाईल.
  • याप्रकारे द्वारे कर्ज केलेल्या जमीन आहे ते जमीन बँकेकडे गहाण राहणार आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये कर्जाची रक्कम फेडताच ती जमीन शेतकऱ्याच्या ताब्यात येणार.
हे कर्ज किती कालावधीमध्ये आपण फेडायचे आहे
या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर एक दोन वर्षात तुम्ही शेती करायला सुरू करत असाल तर हा एक दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होतात तुम्हाला जर सहा महिन्यांनी कर्जाच्या हप्ते असतील ते फेडावे लागते. अशा प्रकारे तुम्ही नऊ दहा दहा वर्षात कर्जाची रक्कम फेडू शकता याशिवाय शेत जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाचे रिपेमेंट करण्यास दोन वर्षाचा हा बँकेकडून दिला जातो

← Previous
Soybean Cotton Rate : सोयाबीन, कापूस, मक्याच्या भावात वाढ.
Next →
Abhay Yojana : वीजबिल थकबाकीदारांना महावितरणचा दिलासा.

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.