Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

Soybean Rate : सोयाबीन बाजारात आज काय घडलं ?

Soybean Rate

देशातील सोयाबीन बाजारात (Soybean Market) सध्या चढउतार पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यापासून सोयाबीनचे दर (Soybean Rate) वाढले. मात्र तरीही देशातील बाजारात सोयाबीनची आवक (Soybean Arrival) वाढलेली नाही. शेतकऱ्यांना दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

देशातील बाजारात मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात तेजी आली होती. सोयाबीनने ५ हजारांवरून अनेक बाजारांमध्ये ६ हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र मंगळवारी आणि बुधवारी सोयाबीनच्या दर क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांनी नरमले होते.

मात्र आज सोयाबीनचा बाजार साधारणपणे स्थिर होता. पण काही बाजार समित्यांमधील दरात आजही १०० ते २०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. मात्र महत्वाच्या आणि मोठ्या बाजार समित्यांमध्ये दरात फारशी नरमाई दिसली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पुन्हा १४.४९ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन दिवसांपासून सोयाबीनची ही दरपातळी कायम आहे. आजही सोयाबीन दरात चढ-उतार होत दर स्थिरावले. तर सोयातेलाच्या दरात किंचित सुधारणा होत दराने ७५.७५ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला.

तर सोयापेंडच्या दरात जवळपास १ टक्क्यांची घसरण झाली होती. आज सोयापेंडचे वायदे ४१४ डाॅलर प्रतिटनाने झाले. जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली. तसेच चीनकडून सोयाबीनला मागणी आहे. याचा परिणाम सोयाीबनच्या दरावर जाणवतोय.

देशातील बाजाराचा विचार करता आजही अनेक ठिकाणी २०० रुपयांपर्यंत दर नरमले. मात्र कमाल दर अनेक बाजारांमध्ये अद्यापही ५ हजार ७०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान मिळतोय. तर सरासरी दराने ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठलाय. मागील आठवडाभरापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. मात्र तरीही बाजारातील आवक काहीशी कमीच आहे.

शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्यानं त्यांनी माल रोखून धरला आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता शेतकऱ्यांना किमान ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

← Previous
शेततळे योजना, शेततळ्यासाठी मिळणार 75 हजार रुपये अनुदान.| Shettale Yojana
Next →
Best Fitness Tips Followed by Professional Athletes

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.