दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्याला देखिल मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अतिवृष्टी च्या पाऊस (Today Weather) मुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यात देखिल मुसळधार पाऊस (Today Weather) कोसळला. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस (Today Weather) सुरू असून, नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क देखिल तुटली आहे. रत्नागिरीतील राजापूर लांजा येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, मालवण येथे 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला.
या मध्ये राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह जिल्ह्याच्या काही ठिकाणी जोरदार पाऊस (Today Weather) झाला आहे. गगनबावडा येथे 160 मिलिमीटर तर आजरा येथे 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. तर पुणे, नाशिक, धुळे, नगर, नंदूरबार जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार सुरु आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त असल्याचे दिसून आले आहे.
किनवट येथे 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर परभणी, हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. निम्न दुधना, विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा (Today Weather) विसर्ग करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील दुधड, शेकटा परिसरात झालेल्या पावसाने लाहूकी नदी दुथडी भरून वाहत आहे. विदर्भात देखिल पावसाने हजेरी लावली असून, बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणत पिकांचे नुकसान झाले आहे.
२४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये
मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
- कोकण : ठाणे, पालघर, रायगड, मुंबई,.
- मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर , नाशिक.
- मराठवाडा : हिंगोली, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, लातूर,नांदेड.
- विदर्भ : वाशीम, बुलडाणा, यवतमाळ ,अमरावती, अकोला. .
